Press "Enter" to skip to content

दिघोडे येथे पारंपारिक व साधेपणाने होळी चा सण साजरा

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।

दरवर्षी होळी चा सण देश भरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो .मात्र आज देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटा चा परिणाम साजरे होणारे सणां वर दिसून येत आहे .तरी पण येणारे प्रत्येक सण धुमधडाक्यात साजरे न करता शासनाच्या नियमांचे पालन करत आपली सणांची परपरा जपत सण साजरे करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

दिघोडे गावात सुद्धा दरवर्षी होळी चा सण मोठ्या धुम धडाक्यात साजारा होत आसतो मात्र यावेळी कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी आगदी साधे पणाने शासनांच्या नियमां चे पालन करत आपली सणां ची परंपरा जोपासत होळी चा आनंद लुटला .

यावेळी दिघोडे येथील स्मारक येथे होळी चे पूजन अश्विन काशिनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी. काशिनाथ पाटील, रमण कासकर, मा.शाखा प्रमुख अनिल पाटील, वसंत पाटील, बलाराम पाटील, प्रल्हाद कासकर, पांडूरंग म्हात्रे, काशिनाथ कासकर, अरुण पाटील, मयूर माळी, संतोष पाटील, विनोद म्हात्रे, धनाजी पाटील आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.