सारडे – वशेणी मार्गावर बसायला दिले खुर्ची-बेंच त्यावर कुणीतरी वाटसरू येऊन निवांत बसावा !!
सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।
पिरकोन गावातील फणसवाडी सेक्टर ११ या …सारडे -वशेणी मार्गावर … फणसवाडी मैत्री कट्टा …सेक्टर ११ येथील बस स्टॉप वर येणारया प्रवाश्यांच्या सोयीकरीता आणि थकल्या -भागल्या वाटसरूनां क्षणभर विश्रांती करितां सोबतच फणसवाडी मैत्री कट्टा…सेक्टर ११ च्या सर्व मित्र मंडळींच्यां संवाद आणि विचार- मंथनाच्या चर्चा रंगण्याकरीता तसेच जेष्ठ नागरिकांनां निवांत क्षणी कट्टयावर बसून अराम करण्या करीता राजू मुंबईकर यांनी उत्तम प्रकारचे आणि आकर्षक असे आरामदायी बेंच ( अराम खुर्च्या )… पिरकोन … फणसवाडी मैत्री कट्टा… सेक्टर ११ येथे भेंट म्हणून दिल्या.
या बेंच ( खुर्च्याचां ) अनावरण सोहळा फणसवाडी मैत्री कट्टा… सेक्टर ११ येथील सर्व मित्रमंडळींच्या आणि जेष्ठ नागरिक मान्यवरांच्या उपस्थितीत पिरकोन येथे फणसवाडी सेक्टर ११ बस स्टॉप येथे पार पडला त्याच वेळी मुंबईकर यांनी..तिथे उपस्थित सर्वांचे आभार प्रदर्शित करताना … फणसवाडी मैत्री कट्टा …सेक्टर ११ या … जागेवर लवकरात लवकर एक निवारा शेड देखील बांधण्याचं आश्वासन देखील दिले.
यावेळी पिरकोन गावचे माजी सरपंच श्री मंगेश भाई म्हात्रे, श्री सूर्यकांत दादा गावंड श्री अनंता गावंड,श्री यतिश गावंड श्री राजेंद्र जोशी,सतिश म्हात्रे,श्री अनिल घरत, प्रमोद जोशी,श्री केतन गावंड, प्रविण जोशी,श्री निशाल गावंड,श्री दिलेश गावंड,श्री सुरेश गावंड,श्री यज्ञेश गावंड,श्री जितेंद्र गावंड,श्री सुनिल गावंड,श्री अभिजित पाटील,मयुर पाटील, सुरज घरत,प्रतिक घरत, श्री मंगेश पाटील,श्री रुपेश पाटील,श्री दिपक पाटील कुंदन गावंड,श्री प्रदिप गावंड महेश जोशी .. जेष्ठ नागरिक.. श्री हरिश्चंद्र गावंड,श्री मनोहर गावंड,श्री धनाजी पाटील,श्री गजानन गावंड आणि सहकारी या सामाजिक जान असणार्या तरुणांनी आणि जेष्ठ नागरिकांनी पिरकोन…फणसवाडी मैत्री कट्टा…सेक्टर ११ सारडे वशेणी मार्गावरील बस स्टॉप वरील मैत्री कट्टयावर एक समाजपयोगी कार्यातून सामापुढे एक आदर्श निर्माण केला.








Be First to Comment