सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत हि तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायत हद्दीत पन्नास पेक्षा जास्त पथदिव्यांची संख्या आहे.मागील काही दिवस परीसरातील पथदिवे बंद असल्याने परीसरात अंधाराचे साम्राज्य होते.शिवाय वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे विजबिलची थकबाकी असल्याने महावितरणाकडून हा विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.
यावेळी माजी सरपंच संदिप मुंढे यांनी मोहोपाडा महावितरण कार्यालयातील उपअभियंता किशोर पाटील व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.व होली-धुलिवंदन सणाला पथदिवे सुरू करण्याची महावितरणाकडे पत्र देवून मागणी केली. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने थोडाफार बिल भरणा करावी अशी महावितरण अधिका-यांनी माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या कडे मागणी केली.त्यानंतर माजी सरपंच संदिप मुंढे यांनी सदर प्रकार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगून ग्रामपंचायतीने एक लाखाचा धनादेश महावितरणाकडे सुपुर्द करताच पथदिवे होळी सणाला प्रकाशले.
माजी सरपंच संदिप मुंढे यांनी प्रयत्न केल्याने होली-धुलिवंदन सणाला परिसर प्रकाशमय झाल्याने नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.








Be First to Comment