सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. उरणमध्ये ही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहे. उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. उरणमध्येसुद्धा कोरोना संदर्भात जनता नियमांचे पालन करीत नसल्याने व प्रशासन वर्गाकडून नियमांची अंमलबजावणी होत नाही. यामुळे जनता बिनधास्तपणे वावरताना दिसते.
उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना कामाच्या धावपळीमुळे कोरोनाची लागण झाल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संतोष माळी यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. तरी माळी यांच्या संपर्कात जे आले असतील त्यांनीही आपली चाचणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








Be First to Comment