ग्रामीण भागात शिमगा साठी लहान मुलांची नवरा – नवरी ची वेशभूषा : लग्न लावतांना कमीत – कमी उपस्थिती दाखविण्याचा दिला ग्रामस्थांना संदेश
सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
खालापूर तालुक्यात कोरोनांनी डोके जरी पुन्हा वर काढले असले तरी सुद्धा लहान मुलांनी ह्या धुळवड सणांचा आनंद लुटला सायंकाळी लहान मुलांनी विविध वेशभूषा करून ग्रामस्थांची मने जिंकली सध्या कोरोना या विषाणू मुले लग्न असल्यांस कमी नागरिकांनी जावून लग्न लावा कारण सध्या कोरोनांनी पुन्हा डोके वर काढले आहे.हे पटवून सांगण्यासाठी लगान मुलांनी नवरा- नवरी चे पात्र साकरण्यात आले होते.विशेष म्हणजे नवरा नवरी ही मुले असून या माध्यमातून त्यांनी नागरिकांना मोठा संदेश दिला.
गेल्या वर्षी कोरोना विषाणू आल्यामुळे सर्वत्र ठिकाणी भितीचे वातावरण निर्माण झाले.मात्र गेल्या दोन तीन महिन्यात यांचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य झळकत होते.मात्र लॉकडाउन स्थितील करण्यात आल्यामुळे कोरोना विषाणू यांनी पुन्हा आपले पाय पसरण्यात सुरुवात केली.मात्र यावरती पुन्हा निर्बंध घालण्यात आले असून प्रत्येकांनी सोशल डिस्टन्स चे पालन करा. सातत्याने हात धुवा,गर्दिच्या ठिकाणी जाणे टाळा असा संदेश नवरा नवरी चे वेशभूषा साकारलेल्या मुलांनी दिला.
विशेष म्हणजे लग्न लावतांनी कमी – कमीत वधु – वर पक्षांच्या लोकांनी उपस्थित राहून लग्न करावे,शिवाय लग्न हे साध्या पद्धतीने करुन अनाठायी खर्च वाचविण्याचा प्रयत्न करा.आज प्रत्येकांची स्थिती उत्तम आहे असे नाही यामुळे आपण लग्नाचा आनाठायी खर्चावर लगाम लावणे हाच या वेशभूषा काढण्याचा संदेश या मुलांनी ग्रामस्थांना दिला.








Be First to Comment