सिटी बेल । उरण । दिप्ती पाटील ।
उरण येथील आनंदनगर विकास संघटना व लक्ष्मी महिला मंडळ यांच्या वतीने होळी निमित्ताने दिला जाणारा आनंदनगर भूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते परशुराम भोईर याना देण्यात आला .हा पुरस्कार आनंदनगर विकास संघटनेचे सरचिटणीस पत्रकार शेखर पाटील यांचे शुभ हस्ते सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन परशुराम भोईर याना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पत्रकार शेखर पाटील म्हणाले परशुराम भोईर यांनी पालवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक व आरोग्य शिबिरे घेतली आहेत .गरीब विध्यार्थी यासाठी दत्तक योजना राबवली आहे. समाज्यासाठी काम करणारे परशुराम भोईर यांनी यापुढे अधिक सेवा करावी यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. यावेळी मा नगरसेविका लता शेखर पाटील .ऍड. विपुल ठाकूर ऍड .संपदा ठाकूर महिला मंडळाच्या पदाधिकारी दीपिका दीनानाथ ठाकूर ,पुष्पा ठाकूर अनिता ठाकूर संगीता ठाकूर मीनल घरत शर्मिला पाटील स्नेहा ठाकूर उज्वला मुनीम मीना पाटील कृष्णा म्हात्रे चंद्रकांत ठाकूर. सुनील नाईक. नारायण ठाकूर. गणेश पाटील. मुकेश पाटील. विश्वास म्हात्रे .मुनीम जाधव. राजेश गावडे . विनोद पाटील. लक्ष्मण ठाकूर .अनिल जाधव केदार आसारकर. मनीष मुंबईकर. सुहास गवस आनंदनगर मधील युवा वर्ग भगिनी नागरिक हजर होते.








Be First to Comment