Press "Enter" to skip to content

माकरडोरा आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून होळी साजरी

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काॅग्रेस महिला सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांचा उपक्रम

सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काॅग्रेस महिला सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्या सहकार्याने उरण तालुक्यातील चिरनेर जवळ असलेल्या माकरडोरा आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना होळी निमित्त जीवनावश्यक वस्तू ,पुरणपोळी व खाऊ वाटप करण्यात आले.

या वेळी माकरडोरा आदिवासी बांधवांतर्फे भावनाताई यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पदी नेमणुक झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला .भावताताई ने सुध्दा आदिवासी बांधवांसमवेत होळी मोठ्या उत्साहात साजरी करून आनंद व्यक्त केला .या वेळी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवेचे संस्थापक अध्यक्ष रायगड भुषण मनोज पाटील ,स्व.तृप्ती सुधीर सुर्वे फांउडेशन उरणचे अध्यक्ष समिर सुर्वे यांचे सहकार्य लाभले .या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई राष्ट्रवादीच्या महीला अध्यक्षा प्राजक्ता मोंडकर,उरण शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गणेश नलावडे,गणेश मोंडकर ,अतिश म्हात्रे,सचिन पाटील,राकेश पाटील,विशाल म्हात्रे ,मनिष म्हात्रे,अतिश पाटील,नियती घाणेकर,आर्यन घाणेकर ,सुरज शेलार,आदि मान्यवर उपस्थित होते .या वेळी आदिवासी बांधवांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.