Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये बच्चे कंपनीची धुलवड साजरी

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत तालुक्यात पारंपारिक पध्दतीने होळीचा सण साजरा केला जातो, होळी आणि धुलवड हे दोन दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुन विविध रंगाची उधळण करुन धुलवड साजरी केली जाते. परंतु दोन वर्षांपासून जगावर, देशावर कोरोना महामारीचे सावट पसरले आहे याचे भान ठेवून शासनाने काही नियम ठरवून दिले आहेत, त्यामुळे धुलवड मोठ्या माणसांनी नाही मात्र बच्चे कंपनींनी काही प्रमाणात साजरी केली.

लहान मुलांना होळीचे वेध अगोदर पासुन लागले असतात बाजारात विक्री साठी आलेल्या विविध प्रकारच्या पिचका-या खरेदीसाठी लहान मुलांचा हट्ट असतो. होळी झाली की दुस-या दिवशी धुलवड साजरी केली जाते, या दिवसाची मुलांसह मोठी माणसेही वाट बघत असतात, आदल्या दिवशी होळीचे किती जागरण झाले तरी लहान मुले सकाळी लवकर उठुन हातात पिचकारी घेऊन धुलवड साजरी करायला बाहेर पडतात, आपल्या हातातील पिचकारीने दुस-याच्या अंगावर रंग उडवत आनंद साजरा करत असतात आणि मग या मध्ये मोठी माणसे, महिला एकमेकांना विविध रंगानी रंगवुन, भिजवून धुलवड साजरी करतात. मात्र या वेळी देशावर, राज्यावर कोरोना महामारीचे सावट आहे याचे भान ठेवून मोठ्यांनी नाही मात्र बच्चे कंपनींनी एकमेकांच्या चेह-यावर सुके रंग लावून थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करून धुलवड साजरी केली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.