उरणमध्ये राष्ट्रवादीला मिळाले बळ
सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।
रायगड चे खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उरण तालुका ग्राहक संपर्क प्रमुख दिपक माळी, शेकाप युवा नेते व चाणजे ग्रामपंचायत सदस्य कैलास मोरेश्वर भोईर व नवघर टाऊनशीप च्या हेमांगी पाटील व कार्यकर्त्यांनी रोहा सुतारवाडी येथे महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शहर अध्यक्ष गणेश नलावडे उपस्थित होते. ख-या अर्थाने राजकीय धुळवड सुरू झाली आहे. उरण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढत आहे. लवकरच यांच्यावर पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे असे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी सांगितले.








Be First to Comment