
नवी मुंबई, पनवेल व रायगड जिल्ह्यात हा पॅटर्न राबवावा
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
प्रा. राजेंद्र मढवी यांनी मालेगाव पटर्न काढा ज्या दिवशी उरणमध्ये सुरू केला त्या दिवसांपासून कोरोना पॉजेटीव्ह पेशंट बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मालेगाव पॅटर्न काढ्याचा प्रा. राजेंद्र मढवी यांचा प्रयोग उरणमध्ये यशस्वी होताना दिसत आहे. यामुळे पेशंटमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
केअर पॉईंट हॉस्पीटल आणि सिडको ट्रेनिंग सेंटर उरण येथे गेल्या १५-२० दिवसांपासुन मालेगाव पॅटर्न काढा रूग्णांना सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपण्याच्या अगोदर दिला जातो. सदर काढा हा स्वत: प्राध्यापक राजेंद्र मढवी सर, संतोष पवार (सामाजिक कार्यकर्ते) आणि मोहन जगताप हे नित्यनियमाने तयार करतात आणि रूग्णांना देतात. हा काढा अत्यंत गुणकारी असल्याने सर्व रूग्ण काढा पिण्यास उत्सुक असतात. काढा सुरू करण्याअगोदर केअर पॉईंट हॉस्पीटल आणि सिडको ट्रेनिंग सेंटर येथील रूग्णांची एकूण संख्या ७०-८० इतकी असायची, परंतु दि. १८/०७/२०२० रोजी हीच संख्या कमी होवुन २० च्या आसपास आली आहे. सर्व रूग्णांकडून काढ्या संदर्भात बोलक्या प्रतिक्रीया येत असुन समाधान व्यक्त होत आहे. काढा नियमीत पिल्यामुळे रूग्ण ठणठणीत बरा होवुन लवकर घरी परत जात आहे. रूग्ण संख्या कमी होण्यामागे तेथील डॉक्टर्स आणि पॅरा मेडीकल स्टाफ यांचे योगदान अतुलनीय आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि काढ्याचे योग्य प्रमाण यांच्या संयोजनामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मालेगाव पॅटर्न काढा बनविण्याची जबाबदारी स्वत: प्रा. राजेंद्र मढवी यांनी घेतल्यावर तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी त्वरीत त्यास परवानगी दिली आणि आवश्यक असलेली सर्व साधन सामग्री उपलब्ध करून दिली. तहसिलदार, उरण यांची अशी अपेक्षा आहे की मालेगाव पॅटर्न काढा हा प्रत्येक गावात सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी पुढाकार घेवुन राबवावा. जेणेकरून उरण तालुक्यातील रूग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल.तसेच नवी मुंबई ,पनवेल रायगड जिल्ह्यात हा पॅटर्न राबविला तर नक्कीच पेशंट बरा होण्याचा आकडा वाढेल. हा उपक्रम राबविण्यामध्ये संतोष पवार, मोहन जगताप, हेमंत पराडकर आणि जान्हवी कांबळे यांनी विशेष सहकार्य केले आहे.






Be First to Comment