सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
खालापूर तालुक्यातील ग्रामीण खेडेगावातील 3 तरुणींनी आपल्या दैनंदिन पॉकीट मिनीतून बचत केलेल्या पैशातून कर्जत शहरातील कन्या शाळेत वह्या वाटप करून चांगलाच आदर्श घालून दिला आहे. या तीन तरुणींनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या वह्या वाटपातून गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास उत्साह मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आताच्या आधुनिक स्पर्धेच्या युगात टिकविण्यासाठी शिक्षण असणे गरजेचे आहे, मात्र काहींना आर्थिक टंचाईमुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागत असते. गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून काही जण पुढाकार घेऊन शैक्षणिक साहित्य वाटप करताना पाहायला मिळत असून असाच पुढाकार तीन मैत्रीणी घेऊन कर्जत शहरातील कन्या शाळेत वह्या वाटप केल्याने या तिन्ही मैत्री कर्जत तालुक्यातील इबसार कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून नवघर येथील भक्ती देशमुख, आत्करगाव मधील पल्लवी पाटील व रुचिता खेडेकर या तीन मैत्रींनीचे नाव आहे.
याबाबत पल्लवी - भक्ती - रुचिता यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या की, आजच्या युगातील वाढती महागाई पाहता असंख्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च परवडनारा नसल्याने अनेक शिक्षणापासून वंचित राहावे आहे. त्यामुळे अनेकांचे शैक्षणिक वर्ष वाया जात असून काही विद्यार्थ्यांना मदतीचा लागावा म्हणून आम्ही मैत्रींणीनी बचत केलेल्या पैशातून वह्या वाटप केल्या आहेत. ज्यातून काही विद्यार्थींनी शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळेल.








Be First to Comment