सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
खालापूर नगरपपंचायतीची पंचवर्षी निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून सक्षम कार्यकर्त्यांवर खालापूर शहराच्या जबाबदाऱ्या देऊन कोणत्याही परिस्थितीत खालापूर नगरपंचायतीमध्ये बदल घडवायचाच असा चंग शिवसेनेने केला असून महिलांची अधिक मजबूत करण्यासाठी खालापूरातील शिवसेना महिला आघाडीच्या सुप्रिया साळुंखे यांच्यावर महिला आघाडीच्या संघटक पदाची जबाबदारी दिल्याने आगामी काळात शिवसेनेत महिलाची फळी निर्माण होईल असा विश्वास शिवसेनेला असल्याने साळुंखे यांच्या निवडी बद्दल शहरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
खालापूर नगर पंचायत ही मागील काळात उदयास आल्याने या ठिकाणी राजकीय महत्व वाढले आहे. याठिकाणी शेकापने सत्ता काबीज केली असून अनेक विकास कामे केली.सध्या शिवसेनेने मोर्चे बांधणी सुरू केली असून नुकताच खालापूर शहरात महिलांची भक्कम फळी तयार करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या व मुंबईच्या महापालिकेच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी खालापूर शहराच्या महिला संघटकपदी सुप्रिया साळुंखे यांची निवड करून शहराची जबाबदारी दिली. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा महिला संघटक रेखाताई ठाकरे या उपस्थित होत्या.
या निवडीमुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत महिलांची मोठी फळी सक्रिय होण्यास मदत होणार असल्याने शिवसेनेत आनंदाचे वातावरण पसरले असून साळुंखे यांच्यावर शुभेछाचा वर्षांव होत आहे. शिवसेना ही 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याला महत्व देते त्यामुळे खालापूर शहरात काही पक्ष फक्त राजकारणाला महत्व देत आहेत. मात्र शिवसेनेने दिलेली जबाबदारी निस्वार्थीपणे सांभाळून पक्षाची ध्येय धोरणा नुसार पुढील काळात काम करून पदाला न्याय देण्याचे काम करणार असून आगामी काळात खालापूरातील महिला बचत गटांना सक्षम करून महिलांची मोठी फळी निर्माण करीन असा विश्वास सुप्रिया साळुंखे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.








Be First to Comment