कर्जत – खालापूर तालुक्यातील पाणी टंचाई गावासाठी सिमेंट काँक्रिट बंधारे मंजुर
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
मागील काही काळात कर्जत व खालापूर तालुक्यातील पाणी टंचाई ग्रस्त गावाचा आमदार महेंद्र थोरवे यांनी पाहणी दौरा केला होता. त्यावेळी नद्यांची पाहणी केली होती व यासंबंधी पाणी अडवून त्याचा वापर गावकऱ्यांसाठी कसा करता येईल याबद्दल नियोजन करण्यात आले होते. त्या बाबतीत लगेच कार्यवाही करून सिमेंट काँक्रिट बंधारे मंजुर करण्यासाठी प्रयत्न केले. आज ते प्रयत्न यशस्वी झाले असून त्या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला.

जलसंधारण विभाग तसेच जिल्हा नियोजन अंतर्गत कर्जत तालुक्यातील कळंब -(निधी 15.14 लक्ष), किकवी-(निधी 58.54 लक्ष), कुरुंग-(निधी 24.90 लक्ष), पाथराज-(निधी 37.45 लक्ष), बोरगाव- (निधी 64.88 लक्ष), लोभेवाडी-(निधी 80.59 लक्ष) तर खालापूर तालुक्यातील ताडवाडी- (निधी 79.58 लक्ष) बंधारा मंजूर करण्यात आला आहे. तसेच या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, या दरम्यान काल्याची वाडी अंत्राट येथे चालू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी यावेळी केली.
या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी साठवणे सहज शक्य होईल तसेच स्थानिकांना त्या पाण्याचा वापर सर्वाधिक काळ करता येईल. होऊ घातलेल्या बंधाऱ्यामुळे स्थानिकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आज विशेष आनंद झाला. आणि यामुळे हि विकास कामे अशीच अविरत सुरु राहतील असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी याप्रसंगी गावकऱ्यांना दिला.

या वेळी उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, शिवराम बदे, उपतालुका प्रमुख भरत डोंगरे, दिलीप ताम्हाणे, विभाग प्रमुख रवी ऐनकर, योगेश दाभाडे, बाजीराव दळवी , माजी सरपंच रामचंद्र मिणमिने, पाथरज सरपंच अंकुश घोडविंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment