Press "Enter" to skip to content

शॉपींग मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्ससाठी  कोविडचे नवे नियम

माॅल मध्ये जातायं ? कोव्हीड अँटीजन टेस्ट चाचणी केल्यानंतरच मिळणार प्रवेश

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।  

पनवेल महापालिका क्षेत्रात  कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी  महापालिका आयुक्तांनी या क्षेत्रातील कोरोना नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः शॉपींग मॉल आणि डिपार्टमेंट स्टोअर्सनी नव्या नियमानुसार काम केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच ते पूर्ण बंद करण्याचा इशाराही, आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नव्या आदेशाद्वारे दिला आहे.

शॉपींग मॉल्स आणि डी मार्ट, स्टार बाजार, रिलायन्स फ्रेश यांसारख्या डिपार्टमेंट स्टोअरसाठी त्यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. शॉपींग मॉल्स आणि डिपार्टमेंट स्टोअरमध्ये मास्कशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये, तापमान तपासूनच प्रवेश दिला जावा, ताप किंवा तापसदृश्य लक्षणे आढळल्यास प्रवेश देऊ नये, प्रवेशद्वारावर सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, यासाठी पुरेसे मनुष्यबळ व्यवस्थापनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच डिपार्टमेंट स्टोअरर्समध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात यावा.

सेंट्रल पार्क वगळता उद्याने आणि मैदाने सकाळी 5.30 ते सकाळी 10 वाजेपर्यंत खुली राहतील, पण यामध्ये ओपन जीम, ग्रीन जीम, खेळाचे साहित्य पुर्ण बंद राहील. तसेच मास्क, सामाजिक अंतराचे काटोकोर पालन करणे बंधनकारक राहील.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.