Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेच्या पेव्हर ब्लॉक निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

कचर्‍यातीन प्लास्टिक पासून पेव्हर ब्लॉक निर्मिती

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील गोळा केलेल्या सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, रबर आणि तोडफोड केलेल्या इमारतीच्या डेंब्रिज पासून पेव्हर ब्लॉक बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, या प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

कर्जत शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, हा कचरा घनकचरा प्रकल्पावर जातो, यापैकी ओला कचरा बायोगॅस साठी वापरून त्याद्वारे पथदिव्यांचा साठी वीज निर्मिती केली जाते, मात्र सुक्‍या कचऱ्याचे मधील प्लास्टिक बाटल्या, रबर, रॅपर, गाडीचे टायर, चपला आदी तसेच तोडफोड केलेल्या इमारतीच्या डेंब्रिज चे सिमेंट मिश्रित वाळू यांचे करायचे काय असा प्रश्न नगरपरिषदेला नेहमी सतावत होता, जरी हा कचरा कोणी विकत घ्यायला आला तरी तो खरेदीदार फारच अल्प कींमत देत असे त्यामुळे नगरपरिषदेला काही विशेष फायदा होत नसे आणि या वाढत जाणाऱ्या कचऱ्यामुळे जागा पडत असे त्यावर उपाय म्हणून आता ह्या सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक तसेच रबर यावर विशिष्ट प्रक्रिया करून घनकचरा प्रकल्प परिसरात एका शेडमध्ये गृवाला कंट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी यातून पेव्हर ब्लॉक ची निर्मिती करणार आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका संचिता पाटील,प्राची डेरवणकर, विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, मधुरा चंदन, भारती पालकर, वैशाली मोरे नगरसेवक राहुल डाळिंबकर, शरद लाड, विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, कार्यालयीन अधीक्षक अरविंद नातू, जितेंद्र गोसावी, सुदाम म्हसे, सुनील लाड, अशोक भालेराव, रवींद्र लाड, कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार आदी उपस्थित होते.

प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही भागात हे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत, चांगला परिणाम दिसून येत आहे, यापुढे तयार करण्यात येणारे पेव्हर ब्लॉक शहरात जिथे गरज आहे तिथे बसवण्यात येतील पेव्हर ब्लॉक बनवण्यासाठी येणारा सर्व खर्च गृवाला कंट्रक्शन अंड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करणार असून त्यातील उत्पन्नानातील काही टक्के उत्पन्न संबंधित कंपनी नगरपरिषदेला देणार आहे, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डम्पिंग ग्राउंड मधील वाढत्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट या माध्यमातून आपोआप लावली जाईल. डेंब्रिज आणि प्लास्टिक तसेच रबर पासून पेव्हर ब्लॉक ची निर्मिती केल्याने या कचऱ्याच्या विल्हेवाट ची समस्या दूर झाली आहे, नगरपरिषद ओ डी एफ प्लस सर्टिफिकेट मिळवण्यात यशस्वी झाली आहे तसेच स्वच्छ भारत अभियान ऑल इंडिया रँक मध्ये येण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत असे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.