हिन्दुस्तान पेट्रोलियमचा उपक्रम, नागरिकांना दिली माहिती
सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
आज जिकडे तिकडे विविध खोदकाम केले जाते नविन रस्ते किंवा एखादी पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम केले जाते.कधी – कधी न कळत त्या ठिकाणी एखादी ऑइल किंवा गॅस लाईन गेली असल्यास त्या ठिकाणी खोदकाम केल्यास ती लाईन लिकेज होवून काही वेळा विषारी वायू अथवा आग सुद्धा लागली जाते.मात्र त्यासाठी आपण काय करावे यासाठी प्रात्यक्षिके करून चौक येथिल वांवढळ येथिल हिन्दुस्तान पेट्रोलियमच्या उरण चाकण शिक्रापूर गेलेल्या पाईप लाईन या ठिकाणी हे प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली.यामुळे भविष्यात होणाऱ्या दुर्घटना यांच्यावर नियंत्रण मिळू शकते.
यासाठी सकाळी ११ :०० वाजता सर्व अधिकारी आणी अग्नीशमन दलाचे कर्मचारी अधिकारी यांच्या समवेत प्रात्यक्षिके घेण्यात आली.यावेळी ड्रिलच्या साह्याने या ठिकाणी पाईप लाईन गलती झाल्याचे भासवून त्या ठिकाणी आग लावण्यात आली.आपण किती वेळामध्ये त्या आगीवर नियंत्रण मिळू शकतो किंवा त्या मध्ये कोणत्याही व्यक्तींना अपघात न होता आपण स्वता सुरक्षित राहू त्या ठिकाणचा परिसर तसेच नागरिक यांना कसे वाचवू शकतो यांचे प्रात्यक्षिके घेण्यात आली.यासाठी त्यांची रंगीत तालीम घेण्यात आली.


आपण त्या साठी काय करु शकतो.
त्याच बरोबर एखादा व्यक्ती बेशुद्ध झाल्यास किंवा अन्य काही त्या व्यक्तीस झाल्यास आपण कसे खबरदारी घेवून त्यांचे प्राण वाचवू शकतो त्याच बरोबर त्याला सुरक्षित स्थळी घेवून जावून त्यास तातडीने प्राथमिक उपचार कसे देवू शकतो यांची तालीम घेण्यात आली. यावेळी या प्रात्यक्षिके करण्यासाठी आणी कर्मचारी यांना माहिती उपलब्ध व्हावी यासाठी खोपोली नगर परिषद अग्निशमन दलाचे अधिकारी हरिदास सूर्यवंशी, मुकेश आर. पाटील – संयुक्त औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालक, महाराष्ट्र शासन , श्री केशव एस. केंद्रे – उप. औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालक, अनिल कोंडीबा विभूते – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस स्टेशन, डॉ.प्रसाद बाबुराव रोकडे – तालुका आरोग्य अधिकारी, खालापूर, श्रीमती. रवीता राजेश खडके – सरपंच वावंढळ, राजेश रघुनाथ खडके, एच पी सी एल चे जनरल मनेजर ,मधुकर भिकाजी इंगोले, डेप्युटी जनरल मनेजर, बी गोपाल कृष्ण, गोलेंद्र मोचाहरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन – राहूल चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे केले.आणि मुख्य व्यवस्थापक, सुरेश कुमार चिदंबरम, यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकाऱ्यानी ही प्रात्याक्षिके सादर केली. या ठिकाणी उपस्थित भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेड, टाटा पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज इ. कंपन्याचे अधिका्यांनी कोणतीही आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास समर्थनासाठी हात पुढे करण्याचे आश्वासन दिले.








Be First to Comment