सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील नाभिक समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते व खांब गावचे सुपुत्र दिलिप मोहिते यांची खांब-धामणसई विभाग ओबीसी समन्वय समितीचे
विभागिय सदस्यपदी निवड झाल्याने ज्ञानांकुर इंग्लिश मेडि.खांबचे वतीने विशेष सन्मान करण्यात आला आहे.
श्री.दिलिप मोहिते हे नाभिक समाजाचे उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत.तर नुकतीच त्यांची विभागिय ओबीसी संघर्ष समितीचे सदस्यपदी निलड झाल्याने ज्ञानांकुर इंग्लिश मेडि.खांबचे चेअरमन रविंद्र लोखंडे, मुख्याध्यापिका रिया लोखंडे, युवा सामाजिक कार्यकर्ते राहूल मोहिते तसेच शाळेतील अन्य शिक्षकवर्ग यांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
सामाजिक बांधिलकीचे नात्यातून समाजात आपल्या सामाजिक व अन्य क्षेत्रातील कार्याचा वेळोवेळी ठसा उमटून चांगले योगदान देणारे दिलिप मोहिते यांनी यापुर्वी घरोघरी व्रुत्तपत्र व लाईटबिलं वितरण करण्याचेही काम उत्तमरीत्या सांभाळले आहे.तर
सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहून काम करीत असताना ते दिसत आहेत.








Be First to Comment