अ.भा.म.साहित्य परिषद मंडणगड शाखेचा अभिनव उपक्रम
सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मंडणगड तालुका शाखेचा “गाव तिथे शाळा,शाळा तिथे बालसारस्वत” हा पहिला उपक्रम जि.प.केंद्रशाळा कुंबळे येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या उपक्रमातंर्गत शाळेतील २१ विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभागी होऊन उत्तमरित्या काव्यसादरीकरण केले. संजय करावडे यांनी सदर कार्यक्रमासाठी मेहनत घेऊन उपक्रम यशस्वी केला. सदर उपक्रमात मंडणगड तालुका शाखेचे अध्यक्ष संदीप तोडकर,कार्याध्यक्ष अमोल दळवी,उपाध्यक्षा संगीता पंदीरकर , सचिव संजय करावडे,सहसचिव पुंडलिक शिंदे आदीजण परिषदेच्या वतीने सहभागी झाले होते.तसेच शाळेचे मुख्याध्यापक जंगम सर, शिक्षक करावडे, मोरे मँडम, चाटे मँडम, केंद्रप्रमुख भोसले सर,श्री. जाधव उपस्थित होते.
आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा पहिला उपक्रम यशस्वी होऊन परिषदेच्या प्रत्यक्ष कृती कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.अशाप्रकारचे मनोगत मंडणगड शाखेचे अध्यक्ष संदीप तोडकर यांनी यावेळी व्यक्त केले. अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या अभिनव उपक्रमाची उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून सांगता करण्यात आली.








Be First to Comment