रसायनीत श्रीहरी पार्कं सोसायटी कार्यालयाचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते उदघाटन
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी पाताळगंगा परिसरातील चांभार्ली येथील श्री हरी पार्कं सोसायटीत विविध जातीधर्माचे 150 कुटूंबीय गुण्यागोविंदाने एकत्र राहत असून या सोसायटीतील एकोपाची चर्चां ठिकठिकाणी होत आहे.या श्री हरी पार्कं सोसायटीच्या कार्यालयाचे उदघाटन माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदारकीची हॅट्ट्रिक करणारे भरतशेठ गोगावले उपस्थित होते.
चांभार्ली रिस येथील श्री हरी पार्कं सोसायटीत विविध जातीधर्माचे 150 कुटूंब गुण्यागोविंदाने राहत असून या सोसायटीत राहणारे नागरिक संकटाच्यावेळी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करीत आहेत.या सोसायटित सर्व सण ही कुटूंबे एकत्रित साजरे करतात.या सोसायटीने आपल्या फंडातुन शानदार कार्यांलय उभारले असून या निमित्ताने श्री सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यालयाचे उदघाटन माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर माजी आमदार मनोहर भोईर व माजी सरपंच संदिप मुंढे यांनी श्री सत्यनारायणाचे दर्शंन घेतले.यानंतर आमदार भरतशेठ गोगावले, माजी सरपंच अशोक मुंढे,परेश पाटील, संतोष ठाकूर आदी उपस्थित होते.यावेली उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री हरी पार्कं सोसायटी पदाधिकाऱ्यांच्यावतीने आभार मानण्यात आले.
यावेळी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोसायटी चे अध्यक्ष संतोष ठाकूर व पदाधिकारी,सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.यावेली माजी आमदार मनोहर भोईर यांनी चांभार्ली येथील श्री हरी पार्कं सोसायटीतील विकासकामांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.








Be First to Comment