Press "Enter" to skip to content

जि.प.सेस फंडातून नडोदे बौद्धवाडा येथे नळपाणी पुरवठा योजना मंजुर

जिल्हा परिषद सदस्या पदमाताई पाटील यांच्या प्रयत्नांना यश

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

वडगाव जि.प.हद्दतील नडोदे बौद्दवाडा येथील नागरिकांनी सुरेश पाटील यांच्याकडे नळ पाईपलाईन करिता मागणी केली असता,सुरेश पाटील यांनी आपल्या जि.प.वार्डमध्ये येणाऱ्या नडोदे बौद्धवाडा ग्रामस्थांची पाण्याची समस्या सोडविण्याकरिता आपली पत्नी जि.प.सदस्या पद्मा सुरेश पाटील यांच्या जि.प.सेस फंडातुन नडोदे बौद्धवाडा येथे नळपाणी पुरवठा योजने करिता ७ लाखाचा निधी मंजुर करुन आज त्याकामाची प्रमा सुरेश पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांना देण्यात आली.

मार्च ते एप्रिल महिन्या अखेरीस पाण्याची टंचाई जाणवू लागते मात्र ती वेळ यावेळी येऊ नये म्हणून स्वतः सुरेश पाटील यांनी पुढाकार घेऊन नडोदे बौद्धवाडी साठी सुमारे सात लाख निधी मंजूर करून त्याची प्रमा ग्रामस्थांना देण्यात आली,स्वच्छ व पारदर्शी कारभार असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या पद्मा सुरेश पाटील यांच्या कामाची पोचपावती म्हणून ग्रामस्थांनी देखील त्यांचे या वेळी आभार मानले.

त्यावेळी नडोदे ग्रामपंचायतीचे सदस्य विकी भालेराव,सामाजिक कार्यकर्ते केदार विचारे, वडगाव ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाटील,दिनेश भालेराव,दिपक तातवडे,योगेश भालेराव, सूरज भालेराव, पंकज भालेराव,सतेश भालेराव, पंकज पांडुरंग भालेराव,सुमित भालेराव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.