Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेतर्फे विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण 2021 माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विद्युत वाहनांसाठी कर्जत नगरपरिषद कार्यालय व फायर स्टेशन येथे मोफत चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले.

नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद कार्यालय व फायर स्टेशन येथे विद्युत वाहनांसाठी मोफत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका विशाखा जिनगरे, संचिता पाटील, प्राची डेरवण कर, स्वामिनी मांजरे, मधुरा चंदन, पुष्पा दगडे, सुवर्णा निलधे,भारती पालकर, नगरसेवक विवेक दांडेकर, राहुल डाळिंबकर, बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, माजी नगरसेवक दिपक मोरे उपस्थित होते.

मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत प्रदूषण मुक्त कर्जत करण्यासाठी विद्युत वाहनांसाठी मोफत चार्जिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे असे सांगितले. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे,

आपल्याला कर्जत प्रदूषण मुक्त करायचे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आता बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या घेऊन कर्जत प्रदूषण मुक्त करायचे आहे, त्यासाठीच नगरपरिषदेने मोफत चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.

कर्जत मध्ये तीन वर्षापूर्वीच मानस मोटार बॅटरीवर चालणाऱ्या मोटरसायकल विक्रीचे दुकान सुरु करणाऱ्या शीतल निघोजकर याप्रसंगी उपस्थित होत्या, उदघाटन समारंभा प्रसंगी कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, जितेंद्र गोसावी, रवींद्र लाड,सुदाम म्हसे, अशोक भालेराव, सुनील लाड, अरुण निगुडकर, गौरव भानूसगरे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.