Press "Enter" to skip to content

कर्जत बाजारपेठे मध्ये तीन दुकानात चोरी करणारा चोरटा

12 तासांच्या आत कर्जत पोलिसांनी आवळल्या चोराच्या मुसक्या

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत बाजारपेठेत अज्ञात चोरट्याने तीन दुकानाचे शटर उचकटून चोरी केली होती, या चोरट्याला अवघ्या बारा तासाच्या आत पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे, पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
याबाबतची हकीगत अशी दि. 21 मार्च 2021 रोजी रात्री कर्जत बाजारपेठेमधील कर्जत स्वस्त औषधी सेवा मेडिकल स्टोअर्स तसेच इतर दोन दुकानांचे अज्ञात चोरट्याने शटर उचकटून मेडिकल स्टोअर्स मधील 19 हजार रुपये रोख रक्कम चोरी करून नेली होती.

त्याबाबत निलेश विजय गुप्ता यांनी 22 मार्च 2021 रोजी कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 51/2021 भा. द. वि.क. 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस हवलदार संदेश सानप हे करीत होते.

चोरीच्या घटना स्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे व परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून गुन्ह्यातील प्राप्त झालेले फुटेज मधील संशयीत इसमाचा शोध घेण्याकामी कर्जत पोलिस ठाण्याच्यावतीने दोन पथके तयार करण्यात आली होती, सदरची पथके विविध हद्दीमध्ये रवाना करण्यात आली त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरा मधील प्राप्त संशयित इसम सचिन अशोक उपाध्याय (वय- 22) वर्ष राहणार अष्टविनायक अपार्टमेंट रमेशवाडी बदलापूर (वेस्ट) जिल्हा ठाणे यास अवघ्या बारा तासाच्या आत कर्जत रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेण्यात कर्जत पोलिसांना यश आले.

सदर इसमाकडे चौकशी करतात तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचे त्याने कबूल करून गुन्ह्यातील चोरून नेलेली 19 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात कर्जत पोलिसांनी यश आले, सदर आरोपी सचिन उपाध्याय याच्याविरुद्ध कोळसेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर 71/2016 भा.द.वि. कलम 379, 34, बदलापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 14/2018 भा.द.वि. कलम 454, 457, 380, उल्हासनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर 221/2017 मु.पो.का.’कलम 122 (क), भिवंडी कल्यान यांच्याकडे गुन्हे दाखल आहेत.

रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदेश सानप, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, पोलीस अंमलदार अश्रुबा बेंद्रे, पोलीस अंमलदार अनुजित शिंदे, पोलीस अंमलदार दशरथ बहिरम यांनी ही कारवाई केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.