सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत नगर परिषद क्षेत्रातील पश्चिम भागात असलेल्या गुंडगे परिसरात फॉरेस्ट ऑफिस ते कलश बिल्डिंग पर्यंतच्या गटार बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
नगरपरिषदेच्या फंडातून सुमारे 9 लाख 37 हजार 502 रुपये खर्च करुन फॉरेस्ट ऑफिसचे कलश बिल्डिंग पर्यंत गटाराचे बांधकाम करण्यात येणार आहे, या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले, या प्रसंगी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे, पाणीपुरवठा सभापती राहुल डाळींबकर, विरोधी पक्षनेते शरद लाड, नगरसेविका पुष्पा दगडे, मधुरा चंदन,प्राची डेरवणकर, सुवर्णा निलधे,भारती पालकर, नगरसेवक बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, विवेक दांडेकर, माजी नगराध्यक्षा सुनंदा कांगणे, कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू,कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार, रविंद्र लाड आदी गुंडगे परीसरातील नागरिक उपस्थित होते.








Be First to Comment