सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असणा-या मोहोपाडा शहरात आसपासच्या परिसरातील नागरिकांनी रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते. यातच खालापूर तालुक्यात गेल्या वर्षभरात वासांबे मोहोपाडा कोरोना संख्येत आघाडीवरच आहे.परीसरात कोरोना रोखण्यासाठी स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विनामास्क वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी मास्क न वापरणा-या मोहोपाडा बाजारपेठेतील नागरिक, व्यापारी यांच्यावर कारवाई करुन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच मास्क न लावता वाहन चालविणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करुन त्यांना मास्क वाटप करण्यात आले.या कारवाईला रसायनी वाहतूक पोलिसांनीही सहकार्य केले.

दरम्यान कोरोना पाश्र्वभूमीवर मोहोपाडा, नविन पोसरी ते मोहोपाडा मच्छिमार्केंट परिसरात कोरोना रोखण्यासाठी नागरिकांत जनजागृती करुन मास्क वाटप करण्यात आले.यानंतर बाजारपेठ परीसरात वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने तीन आसनी रिक्षा स्पिकरद्वारे फिरवून कोरोना रोखण्यासाठी जनजागृती सुरू आहे.यावेली स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड,आरोग्यखात्याचा पुजा पाटील,स्वच्छता कमिटीच्या सौ.गायकर, विवेक ओक, ग्रामपंचायत कर्मचारी सागर म्हात्रे,संजय पाटील, वाहतूक पोलीस संदिप म्हात्रे आदी उपस्थित होते.








Be First to Comment