पनवेल तालुक्यात शेकापला येणार अच्छे दिन ! काशीनाथ पाटील जिल्हा नियोजन समितीत गेल्याने कार्यकत्यांमध्ये उत्साह
पहा यानिमित्ताने काशीनाथ पाटील यांच्याशी सिटी बेल लाइव्ह ने केलेली बातचीत 👇
सिटी बेल । पनवेल ।
गेली अनेक वर्षे काशिनाथ पाटील हे पनवेल पंचायत समितीचा कारभार पाहत आहेत. पदावर कोणी असो परंतु काशिनाथ पाटील यांच्या शिवाय पंचायत समितीत पान देखील हालत नाही हे सर्वश्रुत आहे.
शेतकरी कामगार पक्षाची नाळ ग्रामीण भागात घट्ट रोवून धरण्यात काशिनाथ पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामीण भाग विशेषतः आदिवासी वाड्या हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शेतकरी कामगार पक्षाची शहरी भागात पीछेहाट झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र शेकाप त्याच मजबुतीने उभा आहे. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वांनाच आला आहे, आणि या यशामध्ये काशिनाथ पाटील यांनी पंचायत समिती माध्यमातून केलेल्या कामाचा मोलाचा सहभाग आहे.










Be First to Comment