प्रतीकात्मक कुर्बानी म्हणजे नक्की काय ? सरकारने याचा खुलासा करावा
रायगड काँग्रेस अल्पसंख्यक विभाग मा. जिल्हा सचिव सफदर गजगे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / रायगड #
कोव्हीड -१९ च्या महामारी च्या संकटकाळात महा वकास आघाडी सरकारने संपूर्ण राज्यात सणासुदीत व धार्मिक विधींसाठी नियमावली बनवली आहे त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काही दिवसात मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्त्वाच्या सणानिमित्त (ईद उलदोहा / बकरी ईद ) महाराष्ट्र शासनाच्या गृहविभाग कडून परिपत्रक प्रसिद्ध केले आहे . ( परिपत्रक क्रमांक डी आय एस /0620 /प्र.क्र. 91/ विशा 1 ब. ( दि. 17.07.2020 ) या परिपत्रकानुसार ईदच्या निमित्त कोणती दक्षता घ्यायची याची प्रसिद्धी दिली आहे. परंतु याच परिपत्रक च्या क्रमांक 3 नियमात म्हटले आहे की ” शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करणे” या मुद्द्यावरच मुस्लिम समाजाला प्रश्न पडला आहे प्रतीकात्मक कुर्बानी म्हणजे नक्की काय ? सरकारने याचा खुलासा करावा व प्रतीकात्मक कुर्बानीचे आदेश मागे घ्यावेत अशी मागणी रायगड काँग्रेस अल्पसंख्यक विभाग मा. जिल्हा सचिव सफदर गजगे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
“प्रतीकात्मक कुर्बानी “करण्यास सांगणे म्हणजे सरकार चे हेतू वर आम्हाला संशय येत आहे की सरकार आमच्या धार्मिक विधीमध्ये हस्तक्षेप करत आहे असे मुस्लिम समाजातील सर्व लोकांना वाटत आहे.सोशल डिस्टंसिंग च्या व इतर नियम हे आम्हाला सर्वांना मान्य आहेत आणि त्या नियमांचे पालन मुस्लिम समाज काटेकोरपणे करीत आहे , परंतु समाजाच्या कोणत्याही विधीत सरकारने हस्तक्षेप करू नये हीच आम्हा सर्वांची अपेक्षा आहे . तसेच वरील दिलेल्या परिपत्रकात मधील प्रतीकात्मक कुर्बानीचे आदेश हे मागे घ्यावेत व यापुढे असे धार्मिक विधीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.






Be First to Comment