Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी धनंजय कवठेकर

सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । प्रतिनिधी ।

समाजकारणाचा ध्यास घेत पत्रकार संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम अलिबागमधील पत्रकार धनंजय कवठेकर यांनी केले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्याकडे दक्षिण रायगडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

धनंजय कवठेकर यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने रायगड भुषण पुरस्काराने सन्मानित केले. समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या काही वर्षापासून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकले. वेगवेगळे प्रश्न लेखणीद्वारे उजेडात आणून प्रशासन व शासनाला त्या प्रश्नांची जाणीव करून दिली. रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनच्या अलिबाग तालुका अध्यक्ष पदाची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. ही जबाबदारी त्यांनी खंबीरपणे सांभाळली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची युवा जिल्हा उपाध्यक्ष (दक्षिण रायगड) नियुक्ती करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.