Press "Enter" to skip to content

आमदार रविंद्र पाटील यांची पेण येथे पत्रकार परिषदेत मागणी

100 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा — आमदार रविंद्र पाटील

सिटी बेल लाइव्ह । पेण । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे पोलीस कमिशनर परमजीत सिंह यांच्या कडून दर महिना 100 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली असून मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांकडून दर महिना शेकडो कोटी रुपयांची वसुली करून त्या पैकी 100 कोटी रुपये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना द्यावे अशी मागणी दस्तुरखुद्द गृहमंत्र्यांनी मागितल्याची तक्रार मुंबई पोलीस कमिशनर परमजित सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे त्या अनुषंगाने पारदर्शक चौकशी होण्याकरिता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी घेऊन त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा त्याच प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेऊन या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्राचे माजी कॅबिनेटमंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार रविंद्र पाटील यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मागणी केली आहे.

या पत्रकार परिषदेत करिता पेण तालुका भाजप अध्यक्ष श्रीकांत पाटील व लक्ष्मण जांभळे हे उपस्थित होते. यासंदर्भात पेण तालुका भाजपाच्या वतीने भाजपचे जिल्हा सरचिटणीस बंडू खंडागळे व मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण येथील तहसील कार्यालयात तसेच पेण पोलीस ठाण्यात याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.