Press "Enter" to skip to content

केगाव माणकेश्वर मंदिर सुशोभीकरण व लोकार्पण सोहळा

दांडा येथील बंधारा याचे भूमिपूजन :
माजी आमदार विवेक पाटील यांचे प्रयत्न

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।

उरण येथील माणकेश्वर मंदिर शेड परिसरात पेव्हर ब्लॉक बाजार पूर रस्ता लोकार्पण सोहळा सभापती ऍड सागर कडु व मा उपसभापती वैशाली पाटील यांचे हस्ते संपन्न झाला यावेळी दांडा येथे नाल्याला पूर रक्षक बंधारा चे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सभापती सागर कडू म्हणाले पंचायत समितीच्या माध्यमातून आमदार विवेक पाटील यांच्या प्रयत्नांतून ही विकासकामे होत आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केगाव परिसरात ही कामे होत आहेत येथील मा उपसभापती वैशाली पाटील यांनी पुढाकार घेऊन ही विकास कामांची गंगा आणली आहे.

यापुढेही या भागाच्या विकासाकडे भर देणार असल्याचे सांगितले यावेळी कार्यालयीन चिटणीस नयन म्हात्रे मा जिल्हा परिषद सदस्य चारुदत्त पाटील आदींनी आपले विचार मांडले या कार्यक्रमासाठी मा सभापती नरेश घरत ,म्हतवली सरपंच रंजना पाटील केगाव सरपंच नंदकुमार पाटील , उपसरपंच चितांमण पाटील नवीन शेवा उपसरपंच वनिता म्हात्रे महिला आघाडी प्रमुख सीमा घरत शहर प्रमुख शेखर पाटील शहर अध्यक्षा नयना पाटील मा उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर , शहर उपाध्यक्ष रंजना पाटील भारत राज थळी , निलेश पाटील रेखा घरत ज्योती पाटील सविता म्हात्रे वीणा नाईक रजनी पाटील पूजा पाटील भावना पाटील श्रुतिका पाटील योगिता ठाकूर प्रकाश म्हात्रे आशिष तांबोळी नंदकुमार ठाकूर अमोल तांबोळी नारायण पाटील केगाव ग्रामपंचायत सदस्य नागरीक मोठ्या संख्येने हजर होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.