सिटी बेल लाइव्ह । खांब–रोहे । नंदकुमार मरवडे ।
कोकणच्या नेत्या तथा राज्यमंत्री व रा.जि.पालकमंत्री आदिती तटकरे यांचा वाढदिवस आंबेवाडी जि.प.मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहात विविध प्रकारच्या कार्यक्रमानी साजरा केला.
पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपन्न करण्यात आलेल्या विविध प्रकारचे कार्यक्रमातंर्गत सर्वप्रथम आंबेवाडी नाका येथे केक कापून आदिती तटकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच आंबेवाडी नाका येथे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे वतीने बांधण्यात आलेल्या बसथांबा निवारा शेडचे उद्घाटन, पुई येथील भिक्षेकरी ग्रुह येथे भिक्षेकरूना भोजंन तसेच स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले.तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्या यांच्या वतीने द.ग.तटकरे माध्य. विद्यालय कोलाड येथील विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप आदी कार्यक्रम संपन्न करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते तथा आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, उपसरपंच श्रीकांत चव्हाण, रा.काँग्रेसचे युवक अध्यक्ष जयवंत मुंडे,युवानेते राकेश शिदे,संजय मांडलुस्कर,राकेश लोखंडे, गणपत लोखंडे,जगन्नाथ धनावडे, संजय सानप,महेंद्र वाचकवडे,गणेश वाचकवडे, कुमार लोखंडे, संदीप जाधव, भरत सातांबेकर आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment