सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहा तालुक्यातील भुवनेश्वर – वरसे येथील गायत्री नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित रोहा ची सन २०१९ -२०२० या आर्थिक वर्षाची वार्षिक सभेचे आयोजन गुरुवार, दिनांक.२५ रोजी सायं.०४ :०० वा. करण्यात आले आहे.
राज्यासह जिल्ह्यातील कोरोना चे वाढते प्रादुर्भाव पाहता गायत्री ना.बि.शे.सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या सहमतीने, सहाय्यक उपनिबंधक संस्था यांनी दिलेल्या सूचनेनुसार सन २०१९ – २०२० या आर्थिक वर्षाची वार्षिक मीटिंग, ही व्हिडियो कॉलिंग किंवा ओदर व्हिडिओ मेन अँपद्वारे घेण्यात येणार असून त्याकरिता संस्थेच्या सर्व सभासद व संचालकांनी झुम मिटिंग अँप डाऊनलोड करावे व सभेस उपस्थित राहावे.सदरील सभेची अँप लिंक ही सभेची वेळ लक्षात घेऊन दिनांक २५ रोजी सायं. ४.०० वाजता सदरील ग्रुप वर पाठवण्यात येईल तरी त्या द्वारे वार्षिक सभेस उपस्थित राहवे असे आवाहन अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी केले आहे.







Be First to Comment