Press "Enter" to skip to content

कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते होणार चकाचक

आमदार निधीतून डांबरीकरणाला सुरुवात

कुर्डुस पोयनाड मतदार संघाच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मानसी दळवी

सिटी बेल लाइव्ह । अलिबाग ।

जिल्हा परिषदेच्या कुर्डुस मतदार संघातील कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसी दळवी यांनी कुसुंबळे अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात करताना दिले.

अलिबाग – मुरुडचे आमदार महेंद दळवी यांचा फंडातून डांबरीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या डांबरीकरणामुळे कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते चकाचक होणार आहेत.

कुसंबळे अंतर्गत कातळपाड, डबेवाडी, पिटकीरी, काचली आणि कुसंबळे रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाला जिल्हा परिषद गट नेत्या मानसी दळवी, युवा नेता थळ उपसरपंच अभिराज दळवी, अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी, कुसुंबळे सरपंच मिना लोभी, उपसरपंच रसिका केणी यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना मानसी दळवी यांनी शिवसेनेचे कार्य तप्तर तालुका प्रमुख राजा केणी यांच्या कामाचे कौतूक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.