सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना ८०% समाजकारण व २०%राजकारण ही शिकवण दिली आहे, याचा प्रत्यय उरण शहरातील नागरिकांना आला आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून उरण शहरात कमी पाणी पुरवठा होत असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहराच्या ज्या विभागात पाणी पुरवठा होत नाही त्या सर्व विभागात शिवसेनेतर्फे मोफत टँकरने पाणी पुरवठा केले जात आहे.
नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक अतुल ठाकूर हे स्वतः पाण्याचा टँकर घेऊन उरण शहराच्या सर्व विभागात जात आहेत व नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करत आहेत. या चांगल्या कामासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेननेचे पदाधिकारी,नगरसेवक, नगरसेविका व शिवसैनिकांचे मोलाचे सहकार्य करत आहेत.
सामाजिक बांधिलकी जपत उरणकर नागरिकांना केलेल्या मोफत पाणी पुरवठा कार्याबद्दल सर्व स्तरातून शिवसेनेचे कौतुक होत आहे.








Be First to Comment