Press "Enter" to skip to content

12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकिस

12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुक्यातील पडघे परिसरात राहणाऱया एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच भागातील एका 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या घटनेतील अल्पवयीन मुलाला बलात्कार व पोक्सोच्या कलमाखाली ताब्यात घेऊन त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

या घटनेतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा व पिडीत मुलगी हे दोघेही एकाच भागात राहाण्यास असून दोघे एकमेकांना चांगले ओळखतात. गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलाने पिडीत मुलीला जबरदस्तीने आपल्या घरामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

पिडीत मुलीचा तिच्या आईकडून शोध घेण्यात येत असताना, ती सदर मुलाच्या घरामध्ये सापडली. त्यानंतर सदर मुलाने आपल्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पिडीत मुलीने आपल्या आईला दिली. त्यामुळे पिडीत मुलीच्या आईने सदर मुलाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.