आदिवासी बांधव व शाळेतील शिक्षक झाले संतप्त
आदिवासी बांधवांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी परिसरात बी,पी,सी,एल कंपनीने एच ओ सी कंपनीकडून १०४,५४,६० हेक्टर आर एवढ्या शेत्रातील जमीन घेऊन खरेदी खत केले असून सदर जागा वर बी,पी,सी,एल कंपनीने वॉल कंपाऊंडचे काम चालू केले शासनाने गावातील रोड,वहिवाट रस्ता जाण्या येण्याचा रस्ता शाळा , मंदिरे , गणपती घाट ,या सार्वजनिक क्षेत्राला सोडून वॉल कंपाउंडचे काम करा असा निर्णय दिला असताना ही पराडे कॉर्नर येथील पराडे आदिवासी वाडी यांचा नदी व स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व आदिवासी बांधवांना बांधवांचे मुले शिक्षण घेत असलेल्या उद्योग महिला मंडलाची मराठी शाळेला पोलीस बंदोबस्तात कंपाऊंड करत असल्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये व शिक्षकांत नाराजी पसरली असून याबाबत आदिवासी बांधव संतप्त झाले आहेत.
सदर जागा रस्ता व शाळा सोडून बी,पी,सी,एल कंपनीने वॉल कंपाऊंड करावी अशी विनंती आदिवासी बांधवांनी बी,पी,सी,एल कंपनीला केली असून तरीही आदिवासींचा या प्रश्नाला न जुमानता सदर जागेवर बी,पी,सी,एल, कंपनी बांधकाम करीत असल्यामुळे आदिवासी बांधवांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

याबाबत बी,पी,सी,एलचे रवींद्र येळपाले व खालापूर चौक मंडलाअधिकारी नितीन परदेशी यांच्यात बैठक होऊन सध्या या शाळेला व नदीकडे जाणारा पूर्वीपासून असलेल्या रस्ता याजागेवर वॉल कंपाऊंड घालू नये जोपर्यंत तहसीलदार खालापूर व बी ,पी ,सी, एल,व एच ओ सी व्यवस्थापनाची बैठक होत नाही तोपर्यंत सदर रस्त्याच्या ठिकाणी व शाळेच्या ठिकाणी वॉल कंपाऊंड करू नये असे मंडळ अधिकारी नितीन परदेशी यांनी सांगितले आहे
बी,पी,सी,एल कंपनीच्या या वॉल कंपाऊंडमुळे पराडे ,आंबिवली दापीवली मोहोपाडा या गावातील एच ,ओ, शी कंपनीच्या काळात या क्षेत्रातील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन साई मंदिर, दुर्गा माता मंदिर पाताळेश्वर मंदिर ,चर्च स्मशानभूमी कॉलनी परिसरातील शिवस्मारक तसेच स्थानिक आदिवासी बांधवाना मच्छीमारी करण्यासाठी नदी कडे जाणारा रस्ता हे सर्व सार्वजनिक ठिकाणे या वॉल कंपाऊंड मुळे बंद होणार आहे
ज्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्र असेल त्या ठिकाणी कंपाऊंड करू नये अशी शासनाला नागरिकांची विनंती आहे.
यावेळी शांतता कमिटी सदस्य व राष्ट्रवादी कामगार विभागाच्या कोकण अध्यक्ष अरुण गायकवाड, ग्रामपंचायतीचे सरपंच बाली कातकरी, उपसरपंच प्रतीक पाटील, माजी उपसरपंच दत्ता शिंदे,माजी उपसरपंच दत्ता जांभळे , प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे सचिव समीर खाने, महिला उद्योग मंडळ शाळेच्या मुख्याध्यापक महादेव पाटील, शिक्षक सुप्रिया गायकर, हर्षदा पालवे यांच्यासह आदिवासी बांधव शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment