Press "Enter" to skip to content

रसायनीत शासनातर्फे रेगे हॉस्पिटलला कोविड लसीकरण केंद्राची मान्यता

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असून शासनाकडून खाजगी रुग्णालयांमधूनही लसीकरण मोहीम सुरू होत आहे.यातच खालापूर तालुक्यातील गेल्या वर्षंभरात वासांबे मोहोपाडा विभाग कोरोना रुग्ण आकडेवारीत वरचढ असल्याचे दिसून येते. आसपासच्या परीसरातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी चांभार्ली येथील संपुर्ण रेगे हाॅस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाची सुविधा मंगळवार दि.२३ मार्चपासून सुरू होणार असल्याचे संपूर्ण रेगे हाॅस्पिटलचे संचालक डॉ.रविराज जाधव यांनी बोलताना सांगितले.

डोस घेण्याची वेळ सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ अशी असणार आहे. यावेळी लसीकरणासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र,पेन्शन बुक यापैकी एक ओलखपत्र व स्वतःचा अथवा घरातील एका व्यक्तिचा मोबाईल याची आवश्यकता आहे.कोरोना लसीकरण हे ६० वर्षांपुढील सर्व व्यक्तिंसाठी ,तर ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ज्या व्यक्तिंना प्रतिकारशक्ती कमी करणा-या व्याधी आहेत अशा व्यक्ती तसेच कोविड वाॅरीयर्सं यांना लाभ घेता येईल.लसीकरण शुल्क २५० रु.प्रति व्यक्ती डोस असणार आहे.

तरी नागरिकांनी www.cowin.gov.in यावर नोंदणी करून कोरोना लसीकरण करून घ्यावे,अथवा मो-८९२६१६२६१६/८८८८३८००००यावर संपर्क करावा असे आवाहन डॉ.रविराज जाधव यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.