Press "Enter" to skip to content

शिक्षण संचालकांची “डायट” ला खास सदिच्छा भेट केलं कौतुक

ऐकू मार्गदर्शन खास, करू गुणवत्ता विकास” या तासिका कार्यक्रमात ४ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

कोरोना काळातील शैक्षणिक उपक्रमाबद्दल शिक्षण संचालक दिनकर टेमकर(पुणे) व नेहा बेलसरे(औरंगाबाद ) यांनी खास “डायट” ला सदिच्छा भेट देत केलं कौतूक.. राज्यात कोविडचे रूग्ण वाढत असताना शैक्षणिक व्यवस्थेला उर्जा देण्याच्या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे चे शिक्षण संचालक यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल जि. रायगड येथे आकस्मिक सदिच्छा भेट दिली.

कोरोनाकाळात डायटने राबविलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. मराठी, इंग्रजी, गणित, उर्दू व समाज शास्त्र विभागाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या उपक्रमांबद्दल आढावा घेतला.

याबाबत मराठी विभागाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या “ऐकू मार्गदर्शन खास, करू गुणवत्ता विकास” या कार्यक्रमात ४ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग मिळवल्याबद्दल खास कौतूक केले आहे. समाजशास्त्र विभागाच्या “सरावातून यशाकडे” या कार्यक्रमांतर्गत हजारो विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्र विषयाच्या चाचण्या सोडविल्याचे माहिती घेताच समाधान व्यक्त केले. तसेच इंग्रजी विभागाच्या कृतिपत्रिका आधारित ऑनलाईन तासिकेस हजारो विद्यार्थी उपस्थित राहत असल्याचे पाहून यावेळी आनंद व्यक्त केला. तर गणित विभागाकडून “गट्टी गणिताशी” या कार्यक्रम हजारो विद्यार्थ्यां पर्यत पोहचविल्याबद्दल शाबासकी दिली.

त्याचबरोबरीनं आयटी विभागाने शिक्षकांना तंत्रस्नेही बनवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल जाणून घेतले. एकंदरीत हे उपक्रम “डायट” च्या प्राचार्या चंद्रकला ठोके यांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ अधिव्याख्याता सुभाष महाजन , डॉ. संजय वाघ व सागर तुपे यांच्या मार्गदर्शनानुसार विषय सहायक हेमकांत गोयजी, सविता आष्टेकर, गणेश कुताळ, रोहन पाटील , संजय पाटील, उस्मान शेख, बशीर उलडे, रविंद्र विशे, मनिषा खैरे व सोनल गावंड हे उपक्रमांचे नियोजन व यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याने यांना शुभेच्छा देत भरभरून कौतुक केले.

तसेच तालुकास्तरावर सर्व विषय साधनव्यक्ती, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी सहकार्य करीत असतात.विद्यार्थी हिताचे उपक्रम डायट तर्फे सुरू असताना याची माहिती शासन व जिल्हा परिषद प्रशासना पर्यंत का पोहचत नाही ? या बद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत आयोजित “स्वा ध्याय” उपक्रमात रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभाग घेण्यासाठी “डायटने” विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी सबधितांना दिल्या.

“डायट” पनवेल तर्फे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने विषय सहायक यांचे मोठे योगदान असून साधनव्यक्तींचे सहकार्य व ज्येष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य यांचे मार्गदर्शन असल्याचे दिसते. या शैक्षणिक उपक्रमाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना माहिती द्यावी.

  • दिनकर टेमकर, संचालक
    राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, पुणे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये डायटने जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रभावी उपक्रम राबविल्याचे दिसतेय. या शैक्षणिक उपक्रमा विषयीचे सादरीकरण व शैक्षणिक वर्ष२०२१-२२ मधील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नियोजित कार्यक्रमांचे अंतिमीकरण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , रायगड यांच्याकडून करून घ्यावी.

  • नेहा बेलसरे, संचालक ,
    महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.