सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
“मी जबाबदार”, “कोविड लस सुरक्षित आहे”, “कोरोना अजून संपलेला नाही” “मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा”, “सॅनिटायजर किंवा साबणाने वारंवार आपले हात स्वच्छ धुवा”, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, “आरोग्यदायी राष्ट्राची उभारणी – सुरक्षित जननी विकसित धरणी” “पहिल्या अपत्यासाठी मातेला रु. पाच हजाराचा लाभ”, “बाळाच्या आरोग्यासाठी योग्यवेळी लसीकरण करा”, “बेटी बचाओ, बेटी पाढाओ” यांसह आरोग्य विषयक उपयुक्त माहिती देवून रोहा तालुक्यातील नागोठणे बस स्थानक, वाकण नाका, पिंगळसई या गावांमध्ये जनजागृती करण्यात आली.
रायगड जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, स्वयंसिद्धा सामाजिक विकास, संस्था, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, राजिपचे उपाध्यक्ष तथा शिक्षण, क्रिडा व आरोग्य समितीचे सभापती सुधाकर घारे, राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
या लोककलेचे नेतृत्व जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेंद्र भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसिद्धा संस्थेच्या वतीने सुचिता साळवी करीत असून या जनप्रबोधनाच्या कार्यात सुचित जावरे, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, श्वेता खारकर, प्रतीक कोळी, तुषार राऊळ, प्रसाद अमृते, कुणाल घुगे हे कलाकार सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमास ग्रा . पं . सदस्य अतुल काळे, राकेश जावरे व मुस्तफा सैफी आदी मान्यवर व प्रवासी उपस्थित होते.








Be First to Comment