Press "Enter" to skip to content

राज्यमंत्री तथा पालक मंत्री अदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

आंबेवाडी नाका येथे सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे बस थांबा निवारा शेडची उभारणी

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

राज्यमंत्री तथा पालक मंत्री अदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे आंबेवाडी नाक्यावर हायवेवरील दोन्ही बाजूला तात्पुरत्या निवारा शेडची उभारणी करण्यात आली.

पनवेल ते इंदापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु झाले आणि रस्त्यालगत असणारे वरसगाव आंबेवाडी नाक्यावरील असंख्य दुकानासहित प्रवासी बस स्टॅन्ड जमीन दोस्त झाले.परंतु महामार्गाचे काम सुरु होऊन दहा वर्षे झाली तरी रस्त्याचे काम आजपर्यंत पुर्ण झाले नाही.तसेच आंबेवाडी नाका येथे रस्त्यालगत बस स्थाबा नसल्याने जेष्ठ नागरिक,शाळेतील मुळे,प्रवाशी वर्ग यांना ऊन पावसात उन्हातच उभे रहावे लागत होते.

याविषयी अनेक वेळा वर्तमान पत्रातून बातम्या ही देण्यात आल्या परंतु रस्त्याचे काम पुर्ण झाल्या शिवाय निवारा शेड होणार नाही अशा प्रतिक्रिया समोर येत होत्या एके दिवशी रस्त्यालगत दुकान असणारे एक सुजाण नागरिक आणि आपले कार्यकर्ते प्रमोद लोखंडे यांनी एका गरोदर महिलेला सदर ठिकाणी उन्हात उभे राहिलेले पाहिले .सावली आणि बसायला काही नसले कारणाने तिच्या चेहऱ्यावरील त्रासाचा भाव त्यांनी टिपला आणि वरसगाव – आंबेवाडी नाक्यावरील आपल्या काही मित्रांना या अडचणीची जाणीव करून दिली.

क्षणातच सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून व राकेश शिंदे यांच्या सहकार्यातून सर्व मित्रवर्गानी आणि स्थानिकांनी आपल्या स्वखर्चातून महामार्गाच्या दोन्ही बाजूला दोन टेबल आणि तात्पुरता दोन निवारा शेडची तात्पुरती उभारणी करुन राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या वाढदिवस अनोखा पद्धतीने साजरा केला असल्याचे दिसून येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.