सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।
सुधागड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वाघोशी गावातील सामाजिक कार्यकर्ते नथुराम उर्फ (बंधू) देशमुख यांना नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झाली.त्यांच्या अमूर्तमहोत्सवी सोहोळ्या निमित्त कौटूबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी बंधूंच्या अमृतमहोत्सवाला सगे सोयऱ्यासह पंचक्रोशीतून त्यांच्यावर असंख्य चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे पहावयास मिळाले.
नथुरामराव व पत्नी शारदाबाई या दांपत्यानी शैक्षणिक आणि सामाजिक काम करताना तत्कालीन अनेक अडचणी,कठीण प्रसंग,दुःख,यातना अंगावर झेलत परिवारासाठी अतिशय घेतलेली मेहनत म्हणजे आदर्शच म्हणावा लागेल.गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेत आपल्या स्वतःच्या विहिरीचे पाणी लोकांसाठी दिलेले पुण्याचे काम जनता आजही विसरलेली नाही.शैक्षणिक समस्या लक्षात घेत माजी मंत्री स्व. मोहन पाटील आणि सहकारी वर्ग यांच्या साथीने माध्यमिक विद्यालयाची स्थापना त्यांनी केली.त्यांच्या या कार्यात चिरंजीव विद्याधर,श्रीधर आणि प्रवीण व सूना सौभाग्यवती कांचन,शर्मिला व प्राजक्ता त्याचप्रमाणे जावई सुरेंद्र व कन्या प्रियदर्शनी यांची यांच्या प्रेमरूपी संसारात अमूल्य साथ मिळत असताना नातवंडांचा सहवास त्यांना अनुभवायला मिळत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळाला.





याठिकाणी परिवाराच्या वतीने त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त शुभेछ्या देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील,सुरेश खैरे,सरपंच चिलेताई, उत्तम देशमुख,गोपिनाथ देशमुख, नारायण देशमुख,श्रीपत तात्या देशमुख,प्रधान देशमुख - (पोलीस पाटिल),मनोहर पासलकर,अशोकराव मोरे,गोळे सर,वसंतराव देशमुख,सुरेश देशमुख, प्रदिप देशमुख,दिलीप देशमुख,शशिकांत देशमुख,शामराव ढमाले,गुलाबराव देशमुख,विश्वनाथ देशमुख,किरण गजानन मांडे,उमटे साहेब,गणेशबुवा देशमुख,विलास खोत साहेब,कृषी अधिकारी परबत,सतीश देसाई,अमोल देसाई यांसह अनेक जण उपस्थित होते.
याठिकाणी उपस्थितांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर दिलीप देशमुख,प्रमोद देशमुख,सुर्यकांत मोरे ,गोळे सर व भिमसेन देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध भजनी सम्राट कृष्णाबुवा देशमुख यांच्या गितगायनाने कार्यक्रमाला चांगलीच रंगत लाभली तर या संपूर्ण नेत्रदीपक सोहोल्याचे सुत्रसंचलन नरेश शेडगे व विश्वास देशमुख यांनी केले.








Be First to Comment