उरण पंचायत समिती सभापती सागर कडू यांचा पुढाकार
सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।
उरण चाणजे हद्दीतील गणेशनगर गेट नंबर 2 च्या रस्त्याचे भूमिपूजन उरण पंचायत समितीचे सभापती ॲड सागर कडू यांचे हस्ते झाले.
यावेळी बोलताना सागर कडू यांनी सांगितले की, या नगराच्या पायाभूत सुविधा सोडवण्यासाठी कटिबद्ध असणार आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन स्ट्रीट लाइट ,गटारे या सुविधा उपलब्ध करणार आहोत. या रस्त्याच्या कामासाठी 12 लाखाचा निधी जिल्हा नियोजन समिती यांच्या मार्फत होणार आहे. चाणजे व उरणच्या विकासासाठी शेकाप च्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांनी सांगितले की, ॲड सागर कडू यांच्या कारकिर्दीत विकास गंगा उरणला आली आहे. आज आपण पाहतोय कोविड च्या काळात सागर कडू यांनी आरोग्य सेवा दिली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून विविध विकास कामे होत आहेत.
या नगरातील नागरिकांनी सांगितले की, दहा वर्षे येथे रस्ता नव्हता मात्र इथली होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. शेकाप नेहमीच विकासकामे करण्यात आघाडीवर असतो मात्र आपण कामे करतो त्याला प्रसिद्धी देत चला असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमात उपसभापती शुभांगी सुरेश पाटील महिला आघाडी प्रमुख सीमा घरत शहर प्रमुख शेखर पाटील द्रोणागिरी स्पोर्ट चे अध्यक्ष महादेव घरत चाणजे सरपंच मंगेश थळी मा उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर ,आदी चाणजे व गणेशनगर भागातील नागरिक मोठया संख्येने हजर होते.








Be First to Comment