Press "Enter" to skip to content

रोह्यात मध्यरात्रीनंतर कपड्याच्या दुकानाला आग : आगीत दुकान भस्मसात

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।

रोहयात मध्यरात्री कपड्याच्या दुकानाला आग लागून आगीच्या भक्षस्थानी सापडलेले दुकान अक्षरशः भस्मसात झाले.धाटाव येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचे समोर आले.

रोहा अष्टमी नगर परिषदे समोरील नाकोडा कॉम्प्लेक्स मधे बँक ऑफ इंडिया एटीएमच्या शेजारी असलेल्या भूमिका कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला पहाटे ४:३० वा.दरम्यान आग लागली.नगर परिषदेचा पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रथम दर्शी आग पहाताच त्याने संबंधितांना संपर्क केला.यानंतर त्वरित उपनगराध्यक्ष महेश कोल्हाटकर,जितेंद्र दिवेकर यांसह सहकारी वर्गाने धाटाव येथील अग्निशमन विभागाला संपर्क करताच काही वेळातच अग्निशमन दलाची गाडी येताच तेथील जवानानी आपले प्रयत्न सुरू करून आग नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

याठिकाणी प्रकाश नामदेव साळुंखे याने नव्याने कपड्याचे दुकान सुरू केले होते.या आगीत जीवित हानी मात्र झाली नसली तरी लाखो रुपयाचे वित्त हानी झाली आहे.या अचानक लागलेल्या आगीत भस्मसात होऊन हाती काहीच न राहिलेल्या साळुंखे कुटुंबियांवर मात्र मोठे संकट कोसळले आहे.

दरम्यान मध्यरात्री लागलेली ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली की अन्य कारणामुळे याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.