भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या आंदोलनास महेंद्र घरत यांचा पाठींबा
सिटी बेल लाइव्ह । उरण ।
उरणच्या भेंडखळ गावाच्या हद्दीत वसलेल्या बीपीसीएल प्रकल्पाने उर्वरीत प्रकल्पग्रस्तांची त्वरीत नोकरभरती करावी या मागणीसाठी भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी सोमवार पासून बीपीसीएल कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनास कामगार नेते महेंद्र घरत यांना आपला पाठींबा दर्शविला. भेंडखळ गावातील उर्वरित बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांना नोकरी मध्ये त्वरित समाविष्ट करावेत, जो पर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही, तो पर्यंत आपला संघर्ष चालूच ठेवायचं आहे. या संघर्षामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, काँग्रेस पक्ष त्याच बरोबर महाराष्ट्र इंटक सुध्दा तुमच्या सोबत आहे असे ते यावेळी म्हणाले.
या वेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष व जिल्हा प्रवक्ते मिलिंदजी पाडगावकर, रायगड जिल्हा इंटक चे अध्यक्ष किरीट पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस राम भगत, रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. संध्याताई ठाकूर, नरेश म्हात्रे, लक्ष्मण ठाकूर, सूर्यकांत ठाकूर, लंकेश ठाकूर, अजित ठाकूर, विवेक म्हात्रे , आनंद ठाकूर, आदित्य घरत व मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त भेंडखळ ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment