सिटी बेल लाइव्ह । उदय कळस । म्हसळा ।
ओ.बी. सी. समाजाच्या न्याय हक्कानंसाठी लढाणाऱ्या ओ.बी.सी. संघर्ष समन्वय समिती ची म्हसळा तालुक्याची सभा कै. एस.डी. शिंदे सभागृहात नुकतीच संपन्न झाली. माजी सभापती महादेव पाटिल, 13 गाव आगरी समाज अध्यक्ष संतोष पाटिल आणि म्हसळा तालुका कुणबी समाज अध्यक्ष महादेव भिकू पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या प्रसंगी कुंभार समाज अध्यक्ष सुनिल अंजर्लेकर, नाभिक समाज अध्यक्ष प्रदिप कदम, कोळी समाज अध्यक्ष अनिल बसवत,लक्षुमन भाये, गजानन गिजे, नथुराम खोत, सुरेश कुडेकर, भंडारी समाज अध्यक्ष राजेंद्र बोरकर, भाई बोरकर, शिंपी समाज अध्यक्ष प्रसाद करंबे, यतीन करडे, संतोष उद्धरकर, प्रकाश कोठावले, सुदाम माळी आदि मान्यवर उपस्थित होते.
या सभेचे औचित्य साधून म्हसळा तालुका समिती स्थापन करण्यात आली. या मध्ये सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी महादेव भिकू पाटिल, यांची निवड करण्यात आली. 13 समाजापैकी प्रत्येक समाजाला तालुका समिती मध्ये प्राधान्य देऊन तालुक्याची संघर्ष समन्वय समिती गठीत करण्यात आली.
त्याचप्रमाणे रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती साठी माजी सभापती महादेव चांगु पाटिल, अनिल बसवत, लक्षुमन भाये, सुरेश कुडेकर आणि प्रदिप कदम यांची निवड करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नवनिर्वाचित समितीचे महादेव चांगु पाटिल यांनी स्वागत करताना ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचे सांगून शासनाने यापुढे कोणाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचा कोट्याला हात लावू नये, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल. ओबीसी समाज संघर्ष समन्वय समितीतील सर्व घटकानी यापुढे एकसंघ राहून आपल्या मागण्यांसाठी एकजुटीने सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहन महादेव पाटिल यांनी केले. शेवटी सुरेश कुडेकर यांनी उपस्थित्यांचे आभार मानले.








Be First to Comment