राजकीय परिस्थिती प्रतिकूल असताना कुहिरे गावाने पाठिंबा दिला ती जाणीव नेहमीच राहील : पालकमंत्री आदितीताई तटकरे
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
कोणत्याही ग्रामपंचायतीची इमारत गावासाठी सर्वात महत्वाची इमारत असते. त्या इमारतीत गावातील जनतेच्या अडीअडचणी सोडविल्या जातात. कुठलीही निवडणूक आली तरी जास्त मतदान ग्रामपंचायत निवडणुकीतच केले जाते. कारण जनतेची अपेक्षा सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्याकडून असते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कार्यालय चांगले असणे गरजेचे असून सर्वांना अभिमान वाटेल असे कुहिरे ग्रामपंचायतीचे उत्तम असे कार्यालय भविष्यात असेल आणि या कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी सर्व माजी सरपंच यांचा सत्कार करा अशा महत्वपूर्ण सूचना कुहिरे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके यांना रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी दिल्या. तसेच राजकीय परिस्थिती प्रतिकूल असताना कुहिरे गावाने आम्हाला पाठिंबा दिला त्याची जाणीव मनामध्ये ठेऊन गावाला न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न राहील परंतु इतर ग्रामपंचायतींवर अन्याय होऊ देणार नाही असे अभिवचनही ना. आदितीताई तटकरे यांनी यावेळी दिले.
दरम्यान कुहिरे गावातील प्रलंबित असलेल्या सर्व समस्या येणाऱ्या काळात विविध माध्यमातून सोडविल्या जातील असे आश्वासनही यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी दिले.
नागोठण्याजवळील कुहिरे ग्रामपंचायत हद्दीतील कुहिरे ग्रामपंचायतीचे ग्रामसचिवालय, कुहिरेतील राजिप शाळेची दुरूस्ती व ग्रामपंचायती मधील चाफेवाडीतील अंतर्गत रस्ता अशा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे बोलत होत्या.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पेण तहसीलदार अरुणा जाधव, कुहिरे सरपंच प्रज्ञा वैभव जवके, उपसरपंच मनोहर पारधी, पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, पेण तालुका महिला अध्यक्षा चैताली पाटील, पेण शहर अध्यक्षा सुचिता चव्हाण, कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे, पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, वणी सरपंच प्रगती आवाद, दिपेंद्र आवाद, बेणसे उपसरपंच उद्धव कुथे, पाटणसई ग्रा.पं. सदस्य सचिन कळसकर, नागोठणे ग्रा. पं सदस्य अतुल काळे, दत्ता तरे, गुड्डु मोदी, अक्षय नागोठणेकर, केतन भोय आदी कार्यकर्त्यांसह कुहिरेतील ग्रामस्थ व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके यांनी, प्रास्ताविक सरपंच प्रज्ञा वैभव जवके यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच मनोहर पारधी यांनी केले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घ्या
दरम्यान कोविडच्या पार्शवभूमीवर राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वेळोवेळी वापर करा तसेच विशेषतः जेष्ठ नागरिकांनी शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करा अशी विनंती यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी उपस्थितांना केली.








Be First to Comment