Press "Enter" to skip to content

धाटावमधे सोनारसिद्ध कला मंचाचे उद्घाटन व व्यायाम शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन

सोनारसिद्ध ग्रामदेवतेच्या नावाने उभारलेल्या कलामंचावरून धाटाव मधून तरुण नाटककार,अभिनेता निर्माण होतील : खा.सुनील तटकरे

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।

रोह्याच्या राजकारणाची अनेक गणिते मांडत असताना धाटाववासीयांनी आम्हाला वेळोवेळी विश्वास दाखवला आहे.आपल्या आशीर्वादाचे पाठबळ आम्हांला मोठ्या प्रमाणात असल्यानेच धाटावचा टप्प्याटप्याने आम्हाला विकास साधता आलाय.विकासात्मक कामाच्या उद्घाटन आणि भूमिपूजन होत असताना अतिशय भव्यदिव्य अशा कला मंचाचे उद्घाटन करतांना मला आज खरोखर मनस्वी आनंद होत आहे.धाटाव येथे तालुक्याचे क्रिडा संकुल तयार झाल्यावर आज आपल्या गावासह तालुक्यातील तरुण युवक़ विविध स्तरावर जाऊन कबड्डीसह इतर खेळात राज्य पातळीवर नाव लौकिक करतांना दिसतात. त्याचप्रमाणे या कला मंचावर आता नाटक,किर्तन,भजन असे विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम होतील.याच कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनारसिद्ध ग्रामदेवतेच्या नावाने उभारलेल्या कलामंचावरून धाटाव मधून तरुण नाटककार,अभिनेता निर्माण होईल अशी भावना रायगडचे खा.सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

धाटाव येथील सोनारसिद्ध कला मंचाचे उद्घाटन व व्यायाम शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे,कार्याध्यक्ष मधुकर पाटील,तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर,शंकर भगत,अनंता देशमुख,लिलाधर मोरे, मारुती लहाने,दत्ता चव्हाण,सरपंच सौ. सुवर्णा रटाटे,उपसरपंच यशवंत रटाटे, ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर,माजी उपसरपंच सुदाम रटाटे,महादेव रटाटे, सदस्य अशोक मोरे,रुपेश रटाटे,सोनु जाधव, सदस्या नेहा भोकटे,सुविद्या भोकटे,शुभांगी माने,सुप्रिया मोरे,कल्पना मोरे,उत्तरा म्हसकर,रचना साळुंखे,मंदा वाघमारे, ग्रामस्थ मंडळ धाटाव,विष्णुनगर, बारसोली,आदिवासीवाडी,मळखंडवाडी,ग्रामस्थ,महिला वर्ग, कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून गावाने अबाधित ठेवलेल्या स्वछतेचे कौतुक करीत असताना ते पुढे म्हणाले की,या ग्रामपंचायतीचे नेतृत्व आदरणीय भाईसाहेब पाशिलकर यांनी करुन पंचायत समिती ते जिल्हा परिषदेमध्ये असतांना माझ्याकडे राज्याचे नगर विकास मंत्रीपद होते.त्यावेळीही भाईसाहेबांच्या माध्यमातून धाटावसह तालुकाभरातील विविध विकास कामे आम्हांला करता आली.आता रोह्यातून सुदैवाने विधान सभेच्या निवडणुकितून आदिती निवडून आलेली आहे. तसेच पालकमंत्री सुद्धा अदितीकडे आहे. त्याच बरोबर विकास कामांचे क्रिडा खातेही तिच्याकडे आहे.त्यामुळे धाटावसह तालुकाभरात तिच्याकडून चांगले सहकार्य व योगदान लाभेलच यात काडीमात्र शंका नाही असेही ते म्हणाले.तर व्यायामशाळेत अधिकाधिक साहित्य उपलब्ध करून एखादी नामवंत व्यक्तीने या व्यायाम शाळेस भेट दिली की त्या व्यक्तिलाही व्यायाम करण्याचा मोह आवरता येणार नाही अशी सुसज्ज व्यायामशाळा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तर ग्रामनिधी अंतर्गत विविध विकास कामांमध्ये व्यायामशाळा आठ लाख निधी, धाटाव ग्रामपंचायत सचिवालय २५ लाख, ठक्कर बाप्पा योजनेतून धाटाव आदिवासीवाडी रस्ता कॉक्रिटीकरण 15 लाख असा निधी मंजूर करुन पुढील विविध कामांपैकी रस्ता ५ लाख, चंद्रभागानगर ते खैरेवाडी अंतर्गत रस्त्या १० लाख, नंदाशेठ कांबळे येथील रस्ता १० लाख, बारसोली खैरेवाडी धाटाव स्मशानभूमी रस्ता डांबरिकरण १० लाख आदी कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देणार असे अभिवचन तटकरे यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना शेवटी दिला.

उपस्थित मान्यवरांचे ग्रामपंचायतीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत मोरे यांनी केले तर शेवटी आभार उपसरपंच यशवंत रटाटे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तरुण वर्ग,ग्राम पंचायत कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.