Press "Enter" to skip to content

कल्पेश पवार “युवा पत्रकार” पुरस्काराने सन्मानित

अलिबाग मध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

सिटी बेल लाइव्ह । खारी-रोहे । केशव म्हस्के ।

सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळण्याच्या भूमिकेतून कोलाड विभागांत पत्रकारिता करणारे पत्रकार कल्पेश पवार यांना रायगड प्रेस क्लबकडून स्व.संतोष पवार स्मृती युवा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्याच्या पर्यटनविकास मंत्री रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपुर्वक देण्यात आला.यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, रायगड जिल्हा प्रेस क्लबचे संस्थापक एस.एम. देशमुख,जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप,टाईम्स ऑफ इंडियाचे सहसंपादक प्रफुल्ल मारपकवार, कामगार नेते दिपक रानवडे, मराठी पञकार परिषदेचे विभागीय सचिव विजय मोकल,मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, माजी अध्यक्ष अभय आपटे, जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष भारत रांजणकर ,जिल्हा संघटिका मानसी चेउलकर , प्रेस क्लब माजी अध्यक्ष संतोष पेरणे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी ,रायगड जिल्हा मराठी आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार कल्पेश पवार हे कोलाड विभाग वार्ताहर म्हणून निर्भीड निष्पाती पत्रकारिता करत तरुण वयात आपल्या लेखणीतून अनेक आवाज उठवत आहेत.राजकीय पासून समाजातील सर्व घडामोडींचे ते बातमी संकलन करीत असून, क्राईम बातम्या मध्ये त्यांची विशेष छबी आहे.त्यांच्या पत्रकारितेची दखल जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या पत्रकार संघटनेने घेवून त्यांची स्व.संतोष पवार स्मृती युवा पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

रायगड प्रेस क्लबच्या पंधराव्या वर्धांपनदिनाच्या कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुरुवातीला जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी शाहिरी व पोवाडा असे एकपात्री अभिनयाने दर्जेदार सुरुवात केली.प्रेस क्लब विषयी प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष भारत रांजनकार यांनी तर सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी तर आभार प्रदर्शन रायगड प्रेस क्लब चे सरचिटणीस शशिकांत मोरे यांनी मानले.

रोहे तालुक्यातून कल्पेश पवार यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.कोलाड रोहा मधील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून, फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.