सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा रा.जि.पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुएसोचे द.ग.तटकरे माध्य.विद्यालय कोलाड व ज्युनि. काँलेज कोलाड येथील विद्यार्थ्यांना मास्क व सँनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादूरोगण्यासाठी गतवर्षी मार्चमध्ये लाँकडाऊन पुकारला होता.तसेच शासनाकडून अनेक खवरदारीचे उपायही करण्यात आले. सध्या वाढू लागलेल्या कोरोनापासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे. तर राज्यमंत्री तथा रा.जि.पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या व ना.आदिती तटकरे यांच्या समर्थक व ग्रा.पं.सदस्या प्रितम पाटील यांच्या सौजन्याने व कांचन वाचकवडे,व्रुषाली लोखंडे, कविता महाबळे,यांनी सदरचे मास्क व सँनिटायझरचे वाटप केले आहे.
आपल्या लाडक्या नेत्या आदीती तटकरे यांनी खुप कमी वयात राजकारणात फार मोठी झेप करून मुली व महिलांसाठी फार मोठे कार्य त्यांनी केले आहे. तर आपल्या जिल्ह्याचे पालककत्व पत्करून तळागाळातील जनतेला न्याय देत आहेत.अशाप्रकारे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारँयकर्त्या प्रितम पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.








Be First to Comment