सिटी बेल लाइव्ह । रोहा । नंदकुमार मरवडे /उदय मोरे ।
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना. अदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मेढा ग्रुप ग्रामपंचायत, भिसे ग्रुप ग्रामपंचायत वतीने को.ए.सो मेढा हायस्कूल मधील गरीब गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम रोहा पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण महाले यांच्या अध्यक्षतेखाली व रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्याध्यक्ष महेंद्र खैरे, हायस्कूलचे चेअरमन भगवान गोवर्धने यांच्या उपस्थित व मान्यवरांच्या शुभहस्ते मुलामुलींना शालेय गणवेश व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी लक्ष्मण महाले यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या शैक्षणिक, सामजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील कार्याचा गौरव करीत मंत्रिमंडळात महत्वाच्या आठ खात्यांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळीत, युवा मंत्री म्हणून आपल्या कार्यशालीची छाप विधिमंडळात पाडली आहे. त्या नेहमीच सर्वांना व कार्यकर्त्यांना प्रेमाची वागणूक देत, रायगड मध्ये विकासकामांच्या योजना राबवत आहेत. एक कर्तृत्ववान युवा महिला म्हणून त्यांनी सर्वच क्षेत्रात नावलौकिक केला आहे. यासाठी त्यांना खासदार सुनिल तटकरे विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते. ताईंनी आपल्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध शालेय स्पर्धेचे आयोजन व भेट देऊन शाळेला भौतिक सुविधा प्राप्त करून दिल्या तसेच चेअरमन भगवान गोवर्धने, सरपंच चंद्रकांत ठमके आदिंनी त्यांच्या कार्याचा गौरव करीत आजच्या तरुण पिढीनी त्यांचा आदर्श घ्यावा असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी उपसरपंच नम्रता सुतार, सदस्य उदय मोरे, ज्ञानेश्वरी गोवर्धने, भिसे उपसरपंच तानाजी जाधव माजी सरपंच विलास उंबरे, संतोष सुतार, रघुनाथ करंजे, भगवान करंजे, भगवान मोहिते, नथुराम महाले, आत्मराम घरट, शुभम उंबरे, छगन लाड, मुख्याध्यापिका हेमलता देवकाते, डी आर म्हात्रे सर, प्रदीप जोशी सर, भरसट सर, पाटील सर, कांबळे सर, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी आर म्हात्रे तर आभार देवकाते मॅडम यांनी मानले, उपक्रमाबाबत धन्यवाद देण्यात आले.








Be First to Comment