महाशिवरात्रीला सांगडे येथील उंच डोंगरावरील मंदिर विजेने उजळले
सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील सांगडे ग्रामस्थांचे आराध्य दैवत तसेच प्रचंड श्रद्धा व विश्वसाचे प्रतिक असलेले पुरातन कालीन शिवमंदिरमहाशिवरात्रीला विजेच्या दिव्याने लख्ख उजाळले व याबाबत म.रा.वि.वि.कंपनीने आपली वचनपूर्ती पुर्ण केली.
सांगडे येथील शिवमंदिर हे गावापासून दूर उंच डोंगरावर आहे.हे मंदिर पांडवकालीन असल्याचे येथे असलेल्या विविध गोष्टींवरून सिद्ध होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे पुरातन मंदिर वर्षानुवर्षे अंधारातच असल्याने अनेकवेँळा प्रयत्न करूनही मंदिरापर्यंत विज पोहोचली नाही.तरीही ग्रामस्थांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.अखेर
गतवर्षी कंपनीकडे केल्या गेलेल्या अर्जाचा सहानुभूतीने विचार करून पुढील महाशिवरात्रीचा उत्सवापर्यंत
मंदिर विजेच्या दिव्याने प्रकाशमान होईल असे वचन म.रा.वि.वि.कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हुंडेकरी साहेब यांनी दिले होते व नुकत्याच संपन्न झालेल्या महाशिवरात्री उत्सव सोहळ्यात आपली वचनपूर्ती करून दाखवून या उंच डोंगरावरील मंदिर विजेच्या दिव्याने प्रकाशित झाले.
वरिष्ठ अधिकारी हुंडेकरी यांच्या आदेशान्वये प्रशांत डिगे व वाघमोडे या अधिकारी वर्गानी विद्युतीकरणाबाबतचा सर्व्हे करून याबाबत योग्य ती कार्यवाही पुर्ण करून या भागातील वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेले संदीप भोईर व ठेकेदार दादा धुमाळ यांनीही याबाबत मोलाचे सहकार्य करून विद्युतीकरणाचे काम विनाविलंब पुर्ण करून ग्रामस्थांची इच्छा पुर्ण केली.
पुरातन शिवमंदिर विजेच्या दिव्याने प्रकाशित झाल्याने सांगडे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. व नुकत्याच संपन्न झालेल्या महाशिवरात्री उत्सव सोहळ्याप्रसंगी म.र.वि.वि.कंपनी व सर्व अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग यांच्याबद्दल क्रुतज्ञतेचा भाव व्यक्त करून ग्रामस्थांनी सर्वांचे यथोचित सन्मान करून आभार व्यक्त केले.








Be First to Comment